बेंगळूर
स्वदेशी ऍप कू ने भारतात पदार्पण केल्यानंतर गेल्या 20 महिन्याच्या कालावधीत 1.5 कोटी इतके ग्राहक जोडले आहेत, अशी माहिती मिळाली आहे. पेंद्रीय मंत्री आणि विविध सरकारी मंत्रालये तसेच विभागांच्या मदतीने सदरच्या ऍपकरीता मोठय़ा प्रमाणात ग्राहक वाढले असल्याचे समोर आले आहे. कू हे भारतीय मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म असून ट्वीटरची स्पर्धक कंपनी आहे. यावर्षी तिसऱया तिमाहीत ऍपचे 50 लाख वापरकर्ते वाढले आहेत.