मुंबई
ट्विटरला टक्कर देणारी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्म कू येत्या वर्षभरात 500 जणांची भरती करणार आहे. अभियांत्रिकी शाखेत भरती करण्यासह उत्पादन व्यवस्थापन शाखेत नव्या उमेदवारांना सामावून घेतले जाणार आहे. अलीकडेच कू प्लॅटफॉर्म वापरकर्त्यांची संख्या 1 कोटीवर पोहोचली आहे. सध्या 200 जण प्लॅटफॉर्ममध्ये नोकरी करत आहेत. साधारण वर्षभरात आणखी 500 जणांना या प्लॅटफॉर्ममध्ये सामील करून घेतलं जाणार आहे, असे कू चे सहसंस्थापक अप्रेमेय राधाकृष्ण यांनी सांगितले. विपणन, ब्रँड विपणन या शाखातही नव्याने भरती होणार आहे.