मुंबई / वृत्तसंस्था
मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू क्रिकेटपटू कृणाल पंडय़ाची मुंबई विमानतळावर त्याच्याकडे प्रमाणापेक्षा अधिक सोने आढळून आल्याने चौकशी करण्यात आली. संयुक्त अरब अमिरातीत संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेनंतर तो मायदेशी परतला. त्यावेळी सोने व रोख रक्कम प्रमाणापेक्षा अधिक आढळून आल्याने त्याला अडवण्यात आले. महसूल गुप्तचर संचालनालयाने याची माहिती दिली. 1 नोव्हेंबर 2016 च्या प्रशासकीय नियमानुसार, दुबईहून भारतात येणाऱया पुरुष प्रवासाला 20 ग्रॅमपेक्षा अधिक व महिला प्रवाशाला 40 ग्रॅमपेक्षा अधिक सोने आणता येत नाही.