वृत्तसंस्था/ बडोदा
कोरोना महामारीमुळे तब्बल जवळपास तीन महिन्यांच्या कालावधीनंतर भारताचा अष्टपैलू कृणाल पंडय़ाने आपल्या आऊटडोअर क्रिकेट सरावाला मंगळवारी प्रारंभ केला.
बडोद्याचा क्रिकेटपटू कृणाल पंडय़ा हा भारतीय संघातील अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचा मोठा भाऊ आहे. कृणाल पंडय़ाने आतापर्यंत 18 टी-20 सामन्यांत भारताचे प्रतिनिधीत्व केले आहे. बडोदा येथे कृणालचे निवासस्थान असून कोरोनामुळे 25 मार्चपासून त्याचे वास्तव्य घरीच होते. गेल्या महिन्यात मुंबई संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुरने आपल्या सरावाला पालघर जिल्हय़ातील बोईसर येथे प्रारंभ केला होता. त्याचप्रमाणे चेतेश्वर पुजाराने राजकोटमध्ये नेटमधील सरावाला सुरूवात केली आहे.