आडेली वार्ताहर:
महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत कृषिरत्न काकासाहेब चमणकर हायस्कुल आडेली चा १०० टक्के निकाल लागला आहे या हायस्कुलमधून परीक्षेस बसलेल्या ४४ पैकी ४४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.या हायस्कुलमधून मंगल प्रविण शेणई हिने ४७५ गुणांसह प्रथम, गौरवी अंकुश दाभोलकर हिने ४६४ गुणांसह द्वितीय, सुजित विठ्ठल गोवेकर याने ४५६ गुणांसह तृतीय,जानवी गणेश सोनसुरकर हिने ४३३ गुणांसह चतुर्थ,समिक्षा चंद्रहास सुकळवाडकर हिने ४२५ गुणांसह पाचवा क्रमांक पटकाविला आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा संस्थापक बबनराव शेणई,स्मिता शेणई, शिक्षण प्रसारक समिती वेतोरे चे चेअरमन दिगंबर नाईक,कार्यवाह प्रभाकर नाईक,मुख्याध्यापक देवानंद चव्हाण यांनी अभिनंदन केले आहे.