इरिगेशन फेडरेशनचे खासदार धैर्यशील माने यांना निवेदन
प्रतिनिधी / कोल्हापूर
राज्य इरिगेशन फेडरेशन व कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या पदाधिकाऱयांनी खासदार धैर्यशील माने यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. राज्यातील कृषिपंपधारक व सहकारी पाणीपुरवठÎाच्या कृषिपंपांच्या विद्युत बिलापोटी मिळणारी सबसिडी रद्द करण्यात आलेली आहे. ती पूर्ववत सुरु करावी. तसेच जुलैमध्ये आलेल्या महापुरामध्ये नदीकाठावरील कृषिपंप व विद्युत साहित्याचे झालेले नुकसानभरपाईची पंचनामे होऊन नुकसानभरपाई मिळावी व शेतकऱ्यांच्या व सहकारी पाणीपुरवठा संस्थांच्या पाटबंधारे खात्याची पोकळ थकबाकी माफ करावी. यासाठी शासनाकडे पाठपुरावा करावा या मागणीचे निवेदन खासदार धैर्यशील माने यांना दिले.
यावर लवकरच पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील (यड्रावकर) खासदार संजय मंडलीक यांच्या सोबत कोल्हापूरमध्ये या विषयावर बैठक घेऊन मुंबई येथे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व संबंधित खात्यांच्या मंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करून प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करु अशी ग्वाही खासदार धैर्यशील माने यांनी फेडरेशनच्या शिष्टमंडळास दिली.
यावेळी माजी आमदार सत्यजित पाटील सरूडकर, शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील किणीक।र, करवीर तालुका इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष आर. के. पाटील कोल्हापूर जिल्हा फेडरेशनचे संचालक व महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कार्यकारी समीती सदस्य दत्तात्रय उगले संचालक रणजित जाधव सचिन जमदाडे सचिव मारुती पाटील, फेडरेशनचे पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.