प्रतिनिधी / कराड
येथील कृष्णा रुग्णालयातून सोमवारी आणखी चार कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून आजपर्यंत कोरोना मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 34 झाली आहे. मलकापूर येथील 37 वर्षीय पुरुष, त्याची 2 वर्षीय मुलगी, आगाशिवनगर येथील 68 वर्षीय पुरुष आणि खोडशी येथील 68 वर्षीय पुरुष यांनी कोरोनावर मात केली आहे.
यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, कृष्णा अभिमत विद्यापीठाचे सहाय्यक कुलसचिव एस. ए. माशाळकर, डॉ. रोहिणी बाबर, डॉ. संजय पाटील, डॉ. व्ही. सी. पाटील, कराडचे मुख्याधिकारी यशवंत डांगे यांच्यासह अन्य स्टाफ उपस्थित होता.