प्रतिनिधी/ कराड
येथील कृष्णा हॉस्पिटलमधून आज 8 कोरोनामुक्त रुग्णांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला. आत्तापर्यंत कृष्णा हॉस्पिटलमधून एकूण 214 कोरोनामुक्त रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
कराड तालुक्यातील वडगाव-उंब्रज येथील 86 वर्षीय पुरूष, पाल येथील 55 वर्षीय पुरूष, तुळसण येथील 51 वर्षीय पुरूष, 50 वर्षीय पुरूष, 40 वर्षीय पुरूष, केसे येथील 64 वर्षीय पुरूष, पाटण तालुक्यातील उरूल येथील 26 वर्षीय पुरूष, जांबेकरवाडी येथील 30 वर्षीय पुरूष हे रूग्ण गेले काही दिवस कृष्णा हॉस्पिटलच्या कोरोना विशेष वार्डमध्ये उपचार घेत होते. त्यांचे उपचारनंतरचे अहवाल निगेटीव्ह आल्याने आज त्यांना टाळ्यांच्या गजरात डिस्चार्ज देण्यात आला.
या कोरोनामुक्त रूग्णांचा मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी कृष्णा हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. ए. वाय. क्षीरसागर, त्वचारोगतज्ञ डॉ. मोहन काळे, डॉ. बाळकृष्ण निकम, कामगार कल्याण अधिकारी सौ. अश्विनी शेटे, औषधविभाग प्रमुख उत्तम जाधव, रश्मी कुलकर्णी, चंद्रकांत मोहिते, सिव्हिल सुपरवायझर दिलीप काशीद, डॉ. संजय पाटील यांच्यासह हॉस्पिटलचा अन्य स्टाफ उपस्थित होता.