नवी दिल्ली
कॅट अर्थात कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया टेडर्स या व्यापाऱयांच्या संघटनेने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याचे आवाहन यापूर्वी केले होते. याला अनुसरून आता आणखी एक पाऊल उचलत कॅटने झूम या ऍपच्या वापरावर बहिष्कार घालण्याचे निश्चित केले आहे. यापुढे कॅट संघटना रिलायन्सच्या जिओमीटचा वापर संवादासाठी करणार आहे. कॅटने देशभरातील व्यापारी व सर्व राज्यातील संघटनांना जिओमीटचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. झूम ऍपचा वापर व्यापाऱयांनी यापुढे करू नये असे कॅटने सुचवले आहे. देशभरातून झूम ऍपविषयी आलेल्या तक्रारी आणि अडचणी जाणुन घेत नंतरच झूमवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला असल्याचे कॅटने स्पष्ट केले आहे.