कतरिना कैफचं मादक सौंदर्य अनेकांना भुरळ घातलं. बॉलिवूडमध्ये अनेक वर्षं घालवल्यानंतर कॅटचं सौंदर्य तसूभरही कमी झालेलं नाही. उलट ती आधीपेक्षा जास्तच सुंदर दिसते. कॅटचं सौंदर्य, कामाचा उत्साह, तंदुरूस्ती यांचं गुपित जाणून घ्यायची उत्सुकता प्रत्येकाला असते. योग्य आहारविहार आणि नियमित व्यायाम यांच्या बळावर कॅटने स्वतःचं व्यक्तिमत्त्व खुलवलंय. संतुलित आहारामुळे तिच्या त्वचेला नैसर्गिक तजेला मिळतो. व्यायामामुळे शरीर बळकट होतं. फिटनेसकडे ती लक्ष देते. बारीक असण्यापेक्षाही आरोग्यदायी जीवन जगणं तिला जास्त महत्त्वाचं वाटतं. कॅटचा आहार आणि व्यायामाच्या दैनंदिनीविषयी…
- पाणी प्यायल्याने त्वचेचं सौंदर्य खुलतं हे आपण जाणतो. त्वचा तजेलदार राहावी यासाठी कॅट भरपूर पाणी पिते. सकाळच्या वेळात जास्तीत जास्त पाणी पिण्यावर तिचा भर असतो. उठल्यानंतर ती चार ग्लास पाणी पिते.
- त्वचा उजळ बनवण्यासाठी ती अकाई बेरी आणि गव्हांकुराची पूड यांचं सेवन करते.
- कॅट दर दोन तासांनी खाते. उकडलेल्या भाज्या आणि फळं यांना ती आहारात प्राधान्य देते. तिच्या आहारात कर्बोदकांचं प्रमाण नगण्य असतं. तंतूमय म्हणजे फायबरयुक्त आहारावर तिचा भर असतो.
- कॅट न्याहारी कधीही टाळत नाही. सिरिअल्स आणि ओटमिल्सयुक्त न्याहारी ती करते.
- दुपारच्या जेवणात ग्रील्ड मासे, बटर लावलेला ब्राउन ब्रेड असतो.
- संध्याकाळी ती ब्राउन ब्रेड आणि पिनट बटर असा आहार घेते. तर रात्रीच्या जेवणात सूप, मासे, पोळी आणि ग्रील्ड भाज्या यांचा समावेश असतो.
- कॅटच्या व्यायामातही वैविध्य आाढळतं. ती नियमितपणे योगासनं करते. यामुळे आकर्षक आणि पिळदार शरीरयष्टीचा लाभ तिला झालाय.