देशातील विविध जातीच्या 160 मांजरांचा समावेश
कोल्हापूर प्रतिनिधी
फेलाईन क्लब ऑफ इंडिया, कोल्हापूर ब्रँचच्यावतीने आयोजित केलेल्या मांजरांच्या पहील्या व देशातील दुसऱया कॅट शोंमध्ये, देशातील विविध जातीच्या 160 मांजरांचा समावेश होता. मार्केट यार्डमधील महाराजा बॅक्वेंट येथे 11 ते 6 या वेळेत, झालेला कॅट शो पहाण्यासाठी बालचमुसह कुटुंबाची मोठी गर्दी झाली होती.
मांजरांच्या शौकिनांच्या आग्रहाखातर या शोचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी साधारणपणे सुमारे 15 हुन अधिक प्रकारची देशी विदेशी मांजरे सहभागी झाले होते.. किटनस (पिल्लू) कॅटेगीरी व ऍडल्टस् कॅटेगीरी नर- मादी व स्पेशालिटी ब्रीड कॅटेगीरी अशा स्वरुपामध्ये ही मांजरे होती. बेंगलोर, इंदोर, पुणे, मुंबई, बेळगाव, गोवा, हैद्राबाद आदी भागातील,मेनक्यून, बेंगॉल, पर्शियन, क्लासिक लॉग हेअर, इंडोमावू, सयामिज आदी जातीच्या मांजरांचा समावेश होता.
यामध्ये सर्वसाधारणपणे किटन विनर, ऍडल्ट विनर, वेस्ट ऑफ ब्रीड, स्पेशालिटी बेस्ट इन शो, ऑल ब्रीड बेस्ट इन शो अशी अनेक प्रकारची पारितोषिके देण्यात आली. तसेच कॅटफूडचे, औषधांचे इतर अत्यावश्यक साहित्यांचे स्टॉल्सही उभारण्यात आले होते. विद्यार्थ्याकरीता प्राण्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी फ्री पासेसचे सोय करण्यात आली होती. याचे आयोजन मुकुंद भेंडेगिरी, दिगंबर खोत,महमद राजगोळे,अभिषेक चिले,अकिब शिकलगार आदींनी केले होते.