टोरंटो
कॅनडाच्या सशस्त्र दलात लैंगिक शोषण आणि भेदभावाला तोंड दिलेल्या वर्तमान आणि माजी कर्मचाऱयांची संरक्षणमंत्री अनिता आनंद तसेच वरिष्ठ सैन्याधिकाऱयांनी माफी मागितली आहे. राष्ट्रीय संरक्षण मुख्यालयातून ऑनलाईन प्रसारित कार्यक्रमात कॅनडाच्या सरकारच्या वतीने संरक्षणमंत्री अनिता आनंद, उपसंरक्षणमंत्री जाडी थॉमस तसेच चीफ ऑफ स्टाफ जनरल वायन आयरे यांनी सैन्यातील लैंगिक गैरवर्तन आणि भेदभावामुळे जीवन उद्ध्वस्त झालेल्या सैनिकांची माफी मागितली.
फेसबुकवर या अधिकृत माफीचे थेट प्रसारण करण्यात आले. सरकार आणि सैन्य या समस्यांना हाताळण्यायच प्रयत्नांमध्ये अपयशी ठरल्याने आम्ही माफी मागतो. कॅनडाच्या सरकारांनी हा अभिशाप दूर करण्यासाठी पुरेसे प्रयत्न केले नाहीत. गोष्टी बदलू शकतात, बदलल्या जाव्यात आणि बदलल्या जातील. ही आमची जबाबदारी असल्याचे आनंद यांनी म्हटले आहे.