टोरंटो
कॅनडाकडे जाणाऱया हवाई प्रवाशांना आता हॉटेलमध्ये क्वारंटाईन करण्यात येणार असून यासंदर्भातील नियमावली येत्या 22 फेब्रुवारीपासून लागू करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी याबाबत आदेश दिले आहेत. ट्रुडोने या अगोदरच सक्त असे प्रतिबंध लागू केले आहेत. यामध्ये अनावश्यक हवाई प्रवासावर बंदी लागू आहे. नव्याने कोरोना विषाणुचा संसर्ग होत असल्याची स्थिती निर्माण होत आहे. या पार्श्वभूमीवर कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे. आवश्यकता नसल्यास हवाई प्रवाशांना कॅनडात प्रवेश केल्यास त्यांना आपल्या स्वखर्चाने सरकारने अधिकृत केलेल्या हॉटेलमध्ये तीन रात्रीपर्यंत राहावे लागणार आहे. जे प्रवासी अमेरिकेची सीमा वाहनांच्या सहाय्याने प्रवास करुन जाणे-येणे करणार आहेत, त्यांना हॉटेलमध्ये आयसोलेशनची आवश्यकता नसल्याचे सरकारी अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. ज्या कॅनेडीयन नागरिकांना कोरोना विषाणू प्रतिबंध लस मिळाली आहे. त्यांच्यासाठी हे नियम लागू होणार असल्याचे आरोग्यमंत्री पॅटी हाजडु यांनी स्पष्ट केले आहे.