वृत्तसंस्था/ सिडनी
एटीपी टूरवरील रविवारी येथे झालेल्या पुरूषांच्या एटीपी चषक सांघिक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कॅनडाने पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम लढतीत कॅनडाने स्पेनचा 2-0 असा एकतर्फी पराभव केला. कॅनडा संघातील शेपोव्हॅलोव्ह आणि फेलिक्स यांनी शानदार विजय नोंदविले.
या अंतिम लढतीत पहिल्या एकेरी सामन्यात कॅनडाच्या शेपोव्हॅलोव्हने स्पेनच्या बुस्टाचा 6-4, 6-3 असा पराभव करत आपल्या संघाला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर दुसऱया एकेरी सामन्यात कॅनडाच्या फेलिक्स ऍलीसिमेने स्पेनच्या ऍगटचे आव्हान 7-6 (7-3), 6-3 असे संपुष्टात आणले. शेपोव्हॅलोव्हला विजयासाठी तब्बल दीडतास झगडावे लागले.