वृत्तसंस्था/ मॅलागा (स्पेन)
फेलिक्स ऍगर ऍलीसीमे आणि डेनिस शेपोव्हॅलोव्ह यांच्या शानदार कामगिरीच्या जोरावर रविवारी येथे झालेल्या अंतिम लढतीत कॅनडाने ऑस्ट्रेलियाचा 2-0 असा पराभव करत पहिल्यांदाच डेव्हिस चषकावर आपले नाव कोरले.
एटीपीच्या मानांकनात सहाव्या स्थानावर असलेल्या कॅनडाच्या ऍलीसीमेने आपला एकेरीचा सामना जिंकत ऑस्ट्रेलियाचे आव्हान संपुष्टात आणले. या लढतीतील एकेरीच्या सामन्यात ऍलीसीमेने ऑस्ट्रेलियाच्या ऍलेक्स डी मिनॉरचा 6-3, 6-4 अशा सरळ सेट्समध्ये फडशा पाडला. ऍलीसीमेने हा सामना 1 तास 42 मिनिटात जिंकला. कॅनडाने या प्रति÷sच्या स्पर्धेत 2019 साली अंतिम फेरीत पहिल्यांदाच प्रवेश केला होता आणि त्यावेळी स्पेनने कॅनडाचा पराभव करून जेतेपदावर शिक्कामोर्तब केल्याने कॅनडाचे जेतेपद थोडक्मयात हुकले होते. स्पेनच्या नादाल आणि ऍग्युट यांनी कॅनडाच्या ऍलीसीमे आणि शेपोव्हॅलोव्ह यांना पराभूत केले होते. 2022 च्या डेव्हिस चषक स्पर्धेतील अंतिम लढतीत रविवारी दुसऱया एकेरी सामन्यात शेपोव्हॅलोव्हने ऑस्ट्रेलियाच्या कोकिनाकिसवर 6-2, 6-4 अशी मात करत कॅनडाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. शेपोव्हॅलोव्हला या विजयासाठी तब्बल दीड तास झगडावे लागले. या प्रति÷sच्या स्पर्धेत यावषी कॅनडाने जर्मनी आणि इटली यांना पराभूत करत अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. तर ऑस्टेलियाने क्रोएशियाचा पराभव करत 2003 नंतर पहिल्यांदाच या स्पर्धेत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला होता. कॅनडाच्या 22 वर्षीय ऍलीसीमेने 2022 च्या टेनिस हंगामात एटीपी टूरवरील चार स्पर्धा जिंकल्या असून त्याने कॅनडाला एटीपी चषक मिळवून देण्यात महत्त्वाची कामगिरी बजावली.