ऑनलाईन टीम / टोरांटो :
कॅनडाच्या नोव्हा स्कॉटिया प्रांतात एक धक्कादायक घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. एका बंदूकधाऱ्याकडून अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह 16 जणांचा मृत्यू झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ग्रॅबियल वॉर्टमॅन असे या हल्लेखोराचे नाव आहे. या हल्लेखोराने शनिवारी रात्रीपासून हा गोळीबार सुरू केला तो रविवारी थांबला. पोलिसांनी या हल्लेखोराला संपवल्यावर हा थरार थांबला आणि लोकांनी सुटकेचा श्वास घेतला. मात्र, हल्लेखोराने असे का केले याबाबत अजून काही माहिती मिळालेली नाही.
स्थानिक अधिकाऱ्याच्या माहितीनुसार, या गोळीबारात मृत झालेल्यांमध्ये एक अधिकाऱ्याचा देखील समावेश आहे. तसेच हल्लेखोराने पहिल्यांदा आपल्या लक्ष्यावर निशाणा साधला मात्र, नंतर त्याने अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.
नोव्हा स्कॉटिया चे प्रमुख स्टीफन मैक्नील यांनी सांगितले की, आजवर च्या इतिहासातील हे सर्वात नृशंस कृत्य आहे.