मुंबई :
सार्वजनिक क्षेत्रातील बँक कॅनरा बँकेने सप्टेंबरअखेरच्या तिमाहीत 444.41 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला आहे. यापूर्वी 2019-20 वर्षात याच जुलै ते सप्टेंबरच्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 364.92 कोटी रुपयांचा होता. यावषी तिमाहीत बँकेचे उत्पन्न 20,836.71 कोटी रुपयांवर पोहचलं आहे. एक वर्षापूर्वी हे उत्पन्न 14461.73 कोटी रुपये होते.