तिसऱयांदा मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता
प्रतिनिधी/ बेळगाव
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहाची मुदत यापूर्वी संपुष्टात आली होती. मात्र जुलै महिन्यात मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या कोरोना विषाणूंचा प्रसार होत असल्याने देशातील चार कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सभागृहांची मुदत सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डच्या लोकनियुक्त सदस्यांना पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळण्याची शक्मयता आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सभागृहाची मुदत संपून वर्ष होत आले. पण कोरोना विषाणूंच्या पार्श्वभूमीवर निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या आहेत. प्रारंभी कॅन्टोन्मेंट बोर्डच्या सभागृहाला सहा महिन्यांची मुदत वाढवून देण्यात आली होती. मात्र कोरोना विषाणूंचा प्रसार झपाटय़ाने वाढल्याने संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आले होते. कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालल्याने सर्व निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. त्यामुळे देशातील कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुकादेखील पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे लोकनियुक्त सभागृहाला दुसऱयांदा सहा महिन्यांची मुदतवाढ मिळाली होती. सध्या कोरोनाची लाट पसरण्याची शक्मयता असल्याने तसेच दिल्लीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने देशातील चार कॅन्टोन्मेंट बोर्डांची मुदत सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. बदामी बाग, जम्मू, रामगड आणि मिरट अशा चार कॅन्टोन्मेंट बोर्डांची मुदत डिसेंबर आणि जानेवारीला संपणार आहे. मात्र, चारही कॅन्टोन्मेंट बोर्डांची मुदत सहा महिन्यांनी वाढविण्यात आली आहे. थंडीच्या लाटेमुळे कोरोना विषाणूंचा प्रसार वाढण्याचा धोका आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड 2006 च्या कायद्यात नवीन तरतुदी करण्याचा केंद्र शासनाचा प्रस्ताव आहे. कॅन्टोन्मेंट बोर्ड सदस्यांच्या निवडीबरोबर उपाध्यक्षांची निवड करण्याचा प्रस्ताव आहे. चार समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. या व्यतिरिक्त कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कायद्यात विविध दुरुस्त्या करण्यात येणार आहेत. त्याकरिता निवडणुका लांबणीवर टाकण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डची निवडणूकदेखील सहा महिने पुढे ढकलण्याची शक्मयता असून, सदस्यांना आणखी सहा महिन्यांची वाढीव मुदत मिळणार आहे. त्यामुळे सध्याच्या सदस्यांना साडेसहा वर्षांचा कालावधी मिळणार आहे.