कर्मचारी आयोगाचे कॅन्टोन्मेंटला पत्र : अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी अधिकाऱयांची घेतली भेट
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या स्वच्छता कामगारांप्रमाणेच कॅन्टोन्मेंटमधील कामगारांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशा विविध मागणीचे निवेदन पी. पी. वावा यांना अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्यावतीने देण्यात आले होते. याची दखल घेत स्वच्छता कामगारांना सुविधाबाबत आवश्यक कारवाई करण्याचे पत्र सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. पी. वावा यांनी कॅन्टोन्मेंटला दिले आहे. याची पूर्तता करावी, अशी विनंती संघटनेच्यावतीने कॅन्टोन्मेंटचे मुख्य कार्यकारी अधिकाऱयांना करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट बोर्डचे मुख्य कार्यकारी अधिकारी के. आनंद याची भेट अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी सोमवारी घेतली. तसेच केंद्रीय सफाई कर्मचारी आयोगाचे सदस्य पी. पी. वावा यांच्या पत्राची दखल घेवून स्वच्छता कामगारांना आवश्यक सुविधा पुरविण्याची मागणी केली. तसेच निवेदनाची प्रत सादर करण्यात आली.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या कार्यक्षेत्रातील स्वच्छता कामगारांना पुरविण्यात येणाऱया सुविधांची माहिती पी. पी. वावा यांनी बेळगाव दौऱया दरम्यान घेतली होती. महापालिकेप्रमाणे सुविधा दिल्या जात नाही. अशी तक्रार अखिल भारतीय सफाई मजदूर संघटनेच्या पदाधिकाऱयांनी केली होती. महापालिकेत कामगारांना विविध सुविधा दिल्या जातात. त्याप्रमाणेच कॅन्टोन्मेंटच्या कामगारांना ही सुविधा मिळाव्यात, तसेच त्यांना कायमस्वरुपी घरे देण्यासाठी केंद्रशासनाकडे पाठपुरावा करावा, सफाई कामगारांच्या क्वॉटर्सची दुरूस्ती करावी, कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालय आवारात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवावा, सफाई कर्मचारी दिनाचे आचरण करण्यात यावे. तसेच रेनकोट, गणवेष, गमबुट, हातमोजे, साबण व इतर साहित्य देण्यात यावे. महिन्याच्या पहिल्या तारखेला वेतन अदा करावे अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच कामगारांना केंद्रशासनाच्या स्केलनुसार वेतन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी अध्यक्ष काशीराम चव्हाण, मुरली चक्हाण, विवेक घाटकांबळे, सुभाष चव्हाण, संजय भंडारी आदी उपस्थित होते.