रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकण्याचा प्रकार : पर्यावरणपूरक परिसरात कचऱयाचे ढिगारे, स्वच्छतेकडे दुर्लक्ष
प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर मिलिटरी फार्मच्या समोरील बाजूस मोठय़ाप्रमाणात खुली जागा आणि विविध झाडे आहेत. यामुळे शहराचे पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत होत आहे. सदर जागा कॅन्टोन्मेंट बोर्डच्या हद्दीत येते. मात्र जागेवर इमारतीचे साहित्य टाकण्यात येत आहे. रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकण्यात येत असल्याने कॅन्टोन्मेंटचा कचरा डेपो बनला आहे.
शहराचा पसारा वाढत असल्याने विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी उपक्रम राबविण्यात येत आहेत. रस्त्याचा विकास आदांकरिता शहरातील झाडांची कत्तल करण्यात येत आहे. यामुळे पर्यावरण नष्ट होत चालले आहे. अशातच आता पर्यावरण स्वच्छ ठेवण्यास मदत करणाऱया परिसराची दुरवस्था झाली आहे. बेळगाव-वेंगुर्ला रोड आणि दुसऱया बाजूला क्लब रोडच्या मधील भागात मोठय़ाप्रमाणात झाडे आहेत. व्हॅक्सिन डेपो आणि याठिकाणी सदर जागा पर्यावरणपूरक आहेत. पण मिलिटरी डेअरी फार्मसमोर असलेल्या जागेला डंपिंग ग्राऊंडचे स्वरूप आले आहे. परिसरात कचरा टाकण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जुन्या इमारतीचे साहित्य टाकण्यात येत आहेत. ठिकठिकाणी कचऱयाचे ढिगारे साचले आहेत. तसेच या परिसरात वर्दळ कमी असल्याने रात्रीच्यावेळी ओल्या पाटर्य़ा होत आहेत. मद्यपींसाठी हे ठिकाणी सोयीचे बनले असल्याने मद्यपान करून मद्याच्या बाटल्या याठिकाणी टाकल्या आहेत. यामुळे परिसरातील बाटल्यांचा खच पडला आहे. बाहेरून हिरवेगार दिसणारा परिसर कचऱयाचे आगार बनले आहे.
काही झाडांची पडझड झाली आहे. प्लास्टिक पिशव्या, पत्रावळय़ा, प्लास्टिक ग्लास आणि घरातील जुने साहित्य पसरले आहे. यामुळे परिसराला खुपच बिकट अवस्था प्राप्त झाली आहे. कचरा कुजून दुर्गंधी पसरत आहे. परिसर मिलिटरीच्या ताब्यात असल्याने परिसरामधून ये-जा करण्यास परवानगी देण्यात येत नव्हती. पण अलिकडे या परिसरात जिकडे-तिकडे रस्ते झाले असल्याने वाहनधारक ये-जा करीत असतात. पण सायंकाळच्यावेळी परिसरात कोणीच नसते. याचा गैरफायदा घेवून मद्यपान करणाऱयांसाठी सोयीचे बनले आहे.
परिसराकडे मिलिटरी प्रशासन आणि कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे पर्यावरणपूरक परिसराला अवकळा प्राप्त झाली आहे. परिसराची स्वच्छता करून चांगले उद्यान करून सुशोभिकरण करण्यात आल्यास नागरिकांना याचा उपयोग होवू शकतो. पण याकडे कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांचे दुर्लक्ष झाले आहे.