15 दिवसांत बिल भरण्याचे दिले आश्वासन
प्रतिनिधी /बेळगाव
वीजबिल न भरल्यामुळे हेस्कॉमने कॅन्टोन्मेंट बोर्डचा वीजपुरवठा खंडित केला होता. दीड महिना वीजपुरवठा ठप्प असल्यामुळे संपूर्ण परिसरातील पथदीप बंद होते. कॅन्टोन्मेंट बोर्डच्या वरि÷ अधिकाऱयांनी हेस्कॉमच्या एम. डी. ना 15 दिवसांत बिल भरण्याचे आश्वासन दिल्यानंतर सोमवारी रात्रीपासून वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात आला. यामुळे तब्बल दीड ते पावणेदोन महिन्यांनंतर पथदिपांनी कॅन्टोन्मेंट बोर्ड परिसर झळाळला.
मागील 3 वर्षांपासून कॅन्टोन्मेंट बोर्डने वीजबिल भरलेले नाही. त्यामुळे हे थकीत बिल आता चार कोटी रुपयांवर पोहोचले आहे. हेस्कॉमकडून कॅन्टोन्मेंट बोर्डला पाणीपुरवठा व पथदिपांसाठी वीजपुरवठा केला जातो. बिल भरले नसल्याने 17 जानेवारीला वीजपुरवठा खंडित केला होता. यामुळे संपूर्ण कॅन्टोन्मेंट बोर्ड अंधारात गेले. किल्ला व कॅम्प येथील सर्व परिसर पथदिपांविना अंधारात होता. यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डबाबत नागरिकांमधून संताप व्यक्त करण्यात येत होता.
हेस्कॉमने वीजपुरवठा खंडित केल्यामुळे 55 ठिकाणचे कंट्रोल पॅनेल व 1 हजार ठिकाणचे पथदीप बंद होते. अंधारामुळे चोऱयांचे प्रमाणही वाढले होते. त्यामुळे पथदीप पुन्हा सुरू करावेत, अशी मागणी होत होती. कॅन्टोन्मेंटच्या वरि÷ अधिकाऱयांनी हेस्कॉमच्या एमडी डी. भारती यांच्याशी संपर्क साधून 15 दिवसांत बिल भरण्याचे आश्वासन दिल्यामुळे सोमवारपासून वीजपुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे.
वरिष्ठ अधिकाऱयांमुळे वीजपुरवठा सुरू – अरविंद गदगकर (साहाय्यक कार्यकारी अभियंते-हेस्कॉम)
कॅन्टोन्मेंट बोर्डकडे बिल भरण्यासाठी वेळोवेळी पत्र पाठविण्यात आले होते. विनंती करूनही बिल न भरल्यामुळे अखेर 17 जानेवारीला वीजपुरवठा बंद करण्यात आला. यामुळे कॅन्टोन्मेंटमधील पथदीप बंद होते. कॅन्टोन्मेंटच्या वरि÷ अधिकाऱयांनी बिल भरण्याचे आश्वासन दिल्यामुळे वीजपुरवठा सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.