आगऱयातील चांगला पुढाकार,गरजूंना दिले जातेय मोफत अन्न
आगरा शहरातील शिरोज हँगआउट कॅफे गरजूंना मोफत अन्न पुरवत आहे. हा कॅफे ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिला चालवत आहेत. महामारीदरम्यान स्वतःचे दुःख विसरून या महिला लोकांना मदत करण्याचा शक्य तो प्रयत्न करत आहेत. या कॅफेत जगातील अनेक दिग्गज नेत्यांपासून बॉलिवूड तसेच हॉलिवूडच्या कलाकारांनी भेट दिली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये महामारीमुळे हा कॅफे बंद झाला होता. त्यानंतर 7 महिन्यांनी हा कॅफे पुन्हा सुरू करण्यात आला आहे.
ऍसिड हल्ल्यातून बचावलेल्या महिलांकडून संचालित हा कॅफे पूर्णपणे दरवर्षी तेथे येणाऱया विदेशी पर्यटकांवर निर्भर आहे. कॅफेच्या माध्यमातून ऍसिड हल्ल्यातील पीडितांना आत्मनिर्भर करण्याचा प्रयत्न करत आहे. पण मागील एक वर्षात महामारीमुळे येथे येणाऱया ग्राहकांच्या संख्येत 75 टक्क्यांची घसरण झाली आहे. या महिलांकडे कॅफेत काम करण्याशिवाय उत्पन्नाचा कुठलाच अन्य मार्ग नसल्याचे कॅफेचे संस्थापक आशिष शुक्ला यांनी सांगितले आहे.
आशिष या महिलांच्या उपचारांचा खर्चही उचलतात तसेच त्यांना नियमित स्वरुपात प्रशिक्षणही देतात. आगरा येथील शिरोज कॅफेचे यश पाहता याची एका शाखा लखनौमध्येही सुरू करण्यात आली आहे.