मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोरील उद्यानाच्या देखभालीकडेच संबंधितांचे दुर्लक्ष
प्रतिनिधी / बेळगाव
कॅन्टोन्मेंटच्यावतीने काही ठराविक उद्यानांच्या देखभालीसाठी निधी खर्च करण्यात येतो. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोर असलेल्या उद्यानाच्या देखभालीकडे कॅन्टोन्मेंट बोर्डचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे तेथील उद्यान ओसाड झाले असून, दुरवस्था झाली आहे. या उद्यानाचा विकास कधी होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डकडून उद्यानांचा विकास केला जातो. मात्र, देखभाल व्यवस्थित केली जात नाही. परिणामी उद्यानांची दुरवस्था होत आहे. कॅन्टोन्मेंट कार्यक्षेत्रात येणाऱया विविध उद्यानांच्या देखभालीसाठी लाखो रुपये खर्ची घालण्यात येतात. मात्र, कॅम्पवासियांना महत्त्वाचे आणि गर्दी असणाऱया उद्यानांच्या विकासाकडे कॅन्टोन्मेंटचे दुर्लक्ष झाले आहे.
कॅन्टोन्मेंट बोर्डच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोर असलेल्या उद्यानाचा विकास काही वर्षांपूर्वी करण्यात आला होता. या ठिकाणी लॉन, खेळाचे साहित्य तसेच उद्यानाला संरक्षक कुंपण घालण्यात आले होते. संपूर्ण सुसज्ज करून नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आले होते. मात्र, उद्यानाची देखभाल कॅन्टोन्मेंट बोर्डकडून व्यवस्थित करण्यात आली नाही.
देखभालीकडे कॅन्टोन्मेंटच्या अधिकाऱयांसह कर्मचाऱयांनी दुर्लक्ष केले होते. त्यामुळे सदर उद्यान पूर्णपणे खराब झाले असून, खेळाचे साहित्य मोडकळीस आले आहे. ज्ये÷ नागरिकांना बसण्यासाठी निर्माण करण्यात आलेली आसन खराब झाली आहेत. उद्यानातील लॉन सुकून गेल्याने केवळ माती शिल्लक राहिली आहे. हिरवेगार असणारे उद्यान ओसाड बनले असून, उद्यानात येणाऱया नागरिकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. कॅन्टोन्मेंट बोर्डकडून काही ठराविक उद्यानांची देखभाल करण्यात येते. मुख्य कार्यकारी अधिकाऱयांच्या निवासस्थानासमोर असलेल्या उद्यानाच्या देखभालीकडेच कानाडोळा करण्यात आल्याने दुरवस्था झाली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी साहित्य गंजून गेले असल्याने संपूर्ण उद्यान उपयुक्त नाही. तसेच फिरण्यासाठी म्हणून बनविलेले पदपथ खराब झाले असल्यामुळे उद्यानात फिरावयास येणाऱया नागरिकांसह पालकांतून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या उद्यानाचा विकास करून सुसज्ज बनविण्यात यावे, अशी मागणी होत आहे.