प्रतिनिधी / बेळगाव
मागील चार दिवसांपासून शहर व परिसरात पावसाची रिपरिप सुरू आहे. शनिवारी पहाटेपासून पावसाचा जोर वाढल्याने जुनाट वृक्ष कोसळले. कॅम्प येथील सेंट मेरी स्कूल रोडवर असाच एक जुनाट वृक्ष सकाळी कोसळला. यामुळे आसपासच्या चार विद्युत खांबांचे नुकसान झाले. यामुळे या भागातील वीजपुरवठा काही काळ बंद होता.
शनिवारी सकाळी रस्त्यावर वृक्ष कोसळला, त्यामुळे हा मार्ग बंद करण्यात आला होता. याची माहिती हेस्कॉम व वनविभागाला देण्यात आली. त्यामुळे वीजपुरवठा ठप्प करण्यात आला होता. वनविभागाने झाड तोडून बाजूला केल्यानंतर हेस्कॉमच्या कर्मचाऱयांनी वीजपुरवठा पुन्हा सुरळीत केला. परंतु यामध्ये विजेचे 4 खांब व तारांचे नुकसान झाले.