मैत्रिणींनो, टी शर्ट हा आपल्या वॉडरोबचा महत्त्वाचा भाग असतो. कॅज्युअल ऑकेजनला टी शर्ट शोभून दिसतात. जीन्स टी शर्ट हा लूक तर अनेकींचा आवडता… टी शर्ट घातला की कसं अगदी आरामदायी वाटतं. हाच टी शर्ट वेगवेगळ्या पद्धतींनी कॅरी करता येतो. बॉलिवूड सेलेब्जही टी शर्ट घालतात. तुम्ही त्यांच्याकडून फॅशन टिप्स घेऊ शकता.
- कतरिना कैफने मध्यंतरी निळ्या रंगाचा टी शर्ट आणि डेनिम शॉर्टस घातली होती. तुम्हीही हा लूक कॅरी करू शकता. वर्क फ्रॉम होम करताना टी आणि शॉर्टस घालणार असाल तर केस बांधून घ्या. सोबतच सौम्य मेक अप करता येईल किंवा लिप ग्लॉस लावता येईल.
- आलिया भट्टने टाय डाय टी शर्ट आणि डेनिम शॉर्टस असा लूक केला होता. यासोबत तुम्ही स्मार्ट ऍक्सेसरीज घालू शकता.
- प्लेन व्हाईट टी शर्ट आणि ब्लू जीन्स हे ऑल टाईम हिट कॉम्बिनेशन आहे. जान्हवी कपूरनेही असाच पेहराव केला होता. तुम्ही ट्रेंडी हेअरस्टाईल करू शकता. तसंच सोबर ज्वेलरी घालू शकता.
- टी शर्ट आणि जीन्स किंवा शॉर्टस असं कॉम्बिनेशन केलं जातं. मात्र तुम्ही करिश्मा कपूरप्रमाणे टी शर्ट आणि स्कर्टही घालू शकता.
- अनन्या पांडेसारखं क्रॉप्ड टी शर्ट आणि प्रिंटेड स्कर्ट असा लूकही करता येईल.