जिल्ह्यात एकच खळबळ
सातारा/प्रतिनिधी :
खेड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील एका अपार्टमेंटमध्ये रहात असलेल्या 64 वर्षाचे वयोवृद्ध 14 दिवसांपूर्वी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. सुरुवातीला केलेल्या तपासणीत त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र, काल सायंकाळी त्यांचा रिपोर्ट हा निगेटिव्ह आला. पहाटे त्यांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. नेमका कशामुळे मृत्यू झाला हे प्रशासन लवकरच जाहीर करणार आहे, असे जिल्हा शल्यचिकित्सा डॉ.आमोद गडीकर यांनी तरुण भारत शी बोलताना सांगितले.
सातारा जिल्ह्यातील 64 वर्षच्या कॅलिफोर्निया येथून आलेल्या रुग्णाला 14 दिवसांपूर्वी उपचारासाठी दाखल केले होते.सुरुवातीला त्याचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता.त्यामुळे तो रुग्ण ज्या परिसरात राहत होता तो प्रशासनाने कंटेन्टमेंट झोन करून तेथील सर्वांच्या तपासण्या केल्या. एवढेच नाही तर त्या रुग्णाच्या पत्नीच्या तपासणी केली. निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे सांगण्यात आले. सर्व यंत्रणा त्या परिसरात काळजी घेत होती. पुन्हा दुसऱ्यांदा काल सायंकाळी त्या रुग्णाचे रिपोर्ट निगेटिव्ह निघाले होते परंतु पहाटे त्यांचा मृत्यू झाला. नेमका कशामुळे मृत्यू झाला याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. गडीकर यांच्याशी संपर्क साधला असता काही वेळात प्रशासन सर्व माहिती जाहीर करेल, असे त्यांनी सांगितले.