वृत्तसंस्था/ सेऊल
जागतिक द्वितीय मानांकित नॉर्वेच्या कॅस्पर रुडचे कोरिया ओपन स्पर्धेतील आव्हान उपांत्यपूर्व फेरीत समाप्त झाले. जपानच्या योशिहितो निशिओकाने त्याचा पराभव केला तर ब्रिटनच्या कॅमेरॉन नोरीने तब्बेत बरी नसल्याने स्पर्धेतून माघार घेतली.
निशिओकाने अग्रमानांकित रुडवर प्रारंभापासूनच वर्चस्व राखत पहिला सेट 6-2 असा घेतला. दुसऱया सेटमध्ये रुडने 6-3 असा विजय मिळवित बरोबरी साधली. पण निशिओकाने तिसरा सेट 6-2 असा जिंकून रुडला पराभवाचा धक्का दिला. निशिओकाची पुढील लढत मॅकेन्झी मॅकडोनाल्ड किंवा अलेक्सांडर कोवासेविक यापैकी एकाशी होईल. रुडने यावर्षीच्या एटीपी फायनल्ससाठी आपले स्थान याआधीच निश्चित केले आहे.