योजनेचे प्रमुख अधिकारी श्रीवास्तव यांच्याशी आमदार नीतेश राणेंची चर्चा
प्रतिनिधी / कणकवली:
जिल्हय़ात घराघरात इंटरनेट कनेक्शन मिळणार आहे. गावोगावच्या दुर्गम भागात राहणाऱया विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यासासाठी आवश्यक असलेल्या इंटरनेटची सुविधा लवकरच ‘ऑप्टिकल फायबर इंटरनेट’ योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हय़ातील जनतेला मिळणार आहे. यासाठी आमदार नीतेश राणे यांनी आपल्या मुंबई येथील ‘अधीश’ या निवासस्थानी भारत सरकारच्या या योजनेचे प्रमुख अधिकारी श्रीवास्तव यांच्यासोबत चर्चा केली. लवकरच या योजनेची सुरुवात सिंधुदुर्ग जिल्हय़ात होणार आहे.
प्रत्येक घरासाठी इंटरनेट, हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न सिंधुदुर्गात साकार होण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या नेट सेवेचे प्रभारी श्रीवास्तव यांच्यासमवेत सविस्तर चर्चा केली, जे इंटरनेट कनेक्टिव्हिटी सुनिश्चित करेल, असे आमदार राणे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या फायबर इंटरनेटची माहिती दिली आहे.
ग्रामीण भागात ऑनलाईन शिक्षण घेणे मुलांना नेट नसल्याने अशक्मय झाले आहे. रेशनिंग दुकानावर थम लावण्यासाठी, ग्रामपंचायती, तलाठी कार्यालय येथे दाखले मिळण्यासाठी इंटरनेटची गरज भासते. या सर्व प्रश्नांवर फायबर इंटरनेट हा एकमेव उपाय आहे हे लक्षात घेऊन आमदार राणे यांनी श्रीवास्तव यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी लवकरच सर्व्हे करून सिंधुदुर्गमध्ये ही योजना सुरू करण्याचे आश्वासन दिले.