परिस्थिती हाताबाहेर जावू लागल्याने केंद्राचे पथक दाखल,जिल्हा आरोग्य अधिकाऱयांकडून घेतली माहिती टीममधील दोन अधिकाऱयांनी केले मार्गदर्शन
प्रतिनिधी / सातारा
सातारा जिह्याचा दररोज वाढत चाललेला कोरोना बाधितांचा आकडा हा धक्कादायक आहे. त्याकरिता कोरोनाला अटकाव करण्यासाठी व वाढत चाललेले प्रमाण कसे रोखता येईल यासाठी केंद्राची टीमच साताऱयात दाखल झाली. त्या टीमच्या दोन अधिकाऱयांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱयांकडून आढावा घेण्यात आला. त्यांनी सातारा जिह्यात कोण कोणत्या ठिकाणी हॉटस्पॉट आहेत. तेथे संसंर्ग कसा होतो, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी मार्गदर्शन केले.
सातारा जिह्यामध्ये दररोज आता सातशे ते नऊशेच्या दरम्यान बाधित आढळून येत आहेत. दररोज नवनवीन बाधित रुग्णांची भर पडत आहे. ही रुग्णसंख्या वाढत चालेली भितीदायक असल्याने त्यावर नेमक्या काय उपाययोजना करता येतील याकरिता आज थेट केंद्राचे दोन अधिकाऱयांचे पथक सातारा जिल्हा परिषेद दाखल झाले. त्यांनी जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याकडून जिह्याचा आढावा समजून घेतला. लसीकरण थांबल्याची माहिती घेतली. लसीकरण किती जणांना झाले याची माहिती घेतली. जिह्यात किती जणांचे स्वॅब तपासले जातात. किती जणांना कोरोनाची सरासरी बाधा होतेय याचा आढावा त्या दोन्ही आधिकाऱयांनी घेतला. एका अधिकारी पाँडेचरीचे तर दुसरे ऋषिकेश येथील असून त्यांनी कोरोनाचा ब्रेक लावण्यासाठी साखळी तोडण्यासाठी नेमके काय करता येईल याविषयी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्याशी चर्चा केली.