बेंगळूर/प्रतिनिधी
कर्नाटक विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी केंद्र सरकारने राज्यांमध्ये विनामूल्य लस वितरित करावी, अशी विनंती केली.
राज्यात ६५ वर्षावरील, ४५ ते ६५ वर्षापर्यंत असणाऱ्या व्यक्तींना मोफत लसीकरण करण्यात येत आहे. त्याचबरोबर आता १ मे पासून १८ ते ४४ वर्षापर्यंतच्या व्यक्तींना मोफत लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे लस खरेदीसाठी राज्यावर अतिरिक्त आर्थिक ताण पडणार आहे. दरम्यान सिद्धरामय्या यांनी केंद्राने सरकारला मोफत लस पुरवठा करावा, असे म्हंटले आहे.