बेळगाव / प्रतिनिधी
येथील सुप्रसिध्द रेम्बो ऑफसेट व उद्यमबाग रेम्बो फर्मचे मालक सतीश नेताजी जाधव यांना केंद्रिय अर्थमंत्रालयाच्या प्रत्यक्ष कर विभागाकडून कृतज्ञता प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.
2019-20 या आर्थिक वर्षात व्यवस्थित व वेळेत कर भरणा व आयकर परतावा केल्याबद्दल जाधव यांना कांस्य श्रेणीतील हे प्रमाणात देण्यात आले आहे. सलग दुसऱया वषी त्यांना हे प्रमाणपत्र मिळाले आहे. त्यामुळे त्यांचे कौतुक होत आहे. सतीश जाधव हे बेळगाव प्रेस ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष आहेत.