ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढत आहे. यामध्ये सामान्य जनतेसह कलाकार, राजकीय नेत्यांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातच, आता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री व भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांना देखील कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, माझी आज (शुक्रवार) कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मागील दोन – तीन दिवसात जे कोणी माझ्या संपर्कात आले, त्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी असे आवाहन देखील त्यांनी केले आहे.
दरम्यान, मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात प्रकाश जावडेकर यांनी कोरोनाचा पाहिला डोस घेतला होता.