वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना शनिवारी एम्स (Aघ्घ्श्ए) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. त्यांची तब्येत उत्तम असल्याने त्यांना सोडण्यात आल्याचे रुग्णालयाने सांगितले. 18 ऑगस्ट रोजी त्यांना येथे दाखल केले होते. त्याचवेळी तपासणीनंतर त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला होता. तर 2 ऑगस्ट रोजी त्यांना लक्षणे आढळल्याने प्रथम तपासणी केली असता ते पॉझिटिव्ह आढळले होते. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वत:ला क्वारंटाईन करुन रुग्णालयातून कामकाज पाहत होते. शनिवारी त्यांचा क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाल्याने सोडण्यात आले.