नवी दिल्ली
केंद्रीय गृहराज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांचे वैयक्तिक संकेतस्थळ हॅक झाले आहे. रेड्डी यांचे वैयक्तिक संकेतस्थळ हॅक करून पाकिस्तानी हॅकर्सने देशविरोधी संदेश प्रसारित केले आहेत. या घटनेची पुष्टी जी. किशन रेड्डी यांच्या कार्यालयाने मंगळवारी दिली आहे. हॅकिंगच्या घटनेनंतर संकेतस्थळ तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. संकेतस्थळ हॅक करून देशाच्या नागरिकांपर्यंत चुकीची माहिती पोहोचण्याचा कट हॅकर्सनी आखला होता. तत्पूर्वी 15 ऑगस्ट रोजी पाकिस्तानी संकेतस्थळही हॅक झाले होते. पाकिस्तानच्या एका महिला विद्यापीठासमवेत अन्य संकेतस्थळांवर भारतीय ध्वज दिसून आला होता.