ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय पोलीस दलात आतापर्यंत 36 हजारांहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यामधील जवळपास 30 जवान कोरोनामुक्त झाले असून, 6,646 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर 128 जवानांचा मृत्यू झाला आहे.
बीएसएफमध्ये 10 हजार 336 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे. सीआरपीएफमध्ये 10 हजार 602 जवानांना, सीआयएसएफमध्ये 6 हजार 466 जणांना करोनाची लागण झाली. आयटीबीपीमध्ये 3 हजार 845, एसएसबीमध्ये 3 हजार 684, एनडीआरएफमध्ये 514 आणि एनएसजीमध्ये 250 जवानांना कोरोनाची बाधा झाली आहे.
कोरोनामुळे सीआरपीएफमध्ये 52 जवान दगावले. बीएसएफमध्ये 29, सीआयएसएफमध्ये 28 आणि आयटीबीपी व एसएसबीमध्ये प्रत्येकी 9 जणांचा, एनडीआरएफमध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.