ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद हे स्वतः होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांनी शनिवारी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती.
अमित शहा यांना कोरोनाची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अमित शहा यांनी संपर्कात आल्याल्या लोकांना होम क्वारंटाइन व कोरोनाची तपासणी करण्याचे आवाहन केले होते. त्यानतंर आज रविशंकर हे होम क्वारंटाइन झाले आहेत. त्यांच्यात कोणत्याही प्रकारची लक्षणे आढळली नाही आहेत. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या नियमांचे पालन करत त्यांनी स्वतःला आयसोलेट केले आहे.
याआधी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, कर्नाटक चे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, पी चिदंबरम यांचा मुलगा किर्ती चिदंबरम यांना देखील कोरोनाची बाधा झाली आहे.
दरम्यान, भारतात मागील 24 तासात 52 हजार 972 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले. तर 771 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या आता 18 लाख 03 हजार 696 वर पोहचली असून, मृतांची संख्या 38 हजार 135 एवढी आहे. तर आतापर्यंत 11 लाख 86 हजार 203 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.