ऑनलाईन टीम / बरेली :
केंद्रीय मंत्री संतोष गंगवार यांच्या पत्नी आणि कुटुंबातील अन्य 6 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे. ही माहिती स्वतः संतोष गंगवार यांनी शनिवारी दिली. यावेळी केंद्रीय मंत्री गंगवार यांनी स्वतः ची देखील कोरोना चाचणी करून घेतली असता त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
ते म्हणाले, माझ्या कुटुंबातील सदस्य नुकतेच दिल्लीतून आले आहेत. तिथे त्यांना कोरोनाचा संसर्ग झाला. सर्व सदस्यांना फरिदाबादमधील ईएसआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत.
पुढे ते म्हणाले आमच्या घरात जेवण बनवणाऱ्या आचाऱ्यांची तब्येत बिघडली आहे. त्यामुळे त्यांना देखील सुरक्षिततेच्या कारणास्तव रुग्णालयात दाखल केले आहे.