ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
त्या आपल्या ट्विटमध्ये म्हणाल्या की, माझा कोविड 19 चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी त्यांची तपासणी करावी, अशी मी सर्वांना हात जोडून विनंती करते.
दरम्यान, स्मृती इराणी ह्या बिहार निवडणूक प्रचारामध्ये सहभागी होत्या. या कोरोना विषाणूच्या विळख्यात अनेक जण सापडले आहेत. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, नितीन गडकरी, अर्जुन मेघवाल, देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्र्यांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे.