पोखरियाल यांच्या कन्येचे लवकरच चित्रपट पदार्पण
अभिनेत्यांसह आता नेत्यांच्या कुटुंबातील नवी पिढीही चित्रपटक्षेत्रात उतरू लागली आहे. या यादीत केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांची कन्या आरुषिचे नाव जोडले गेले आहे. आरुषि एका युद्धपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे. चित्रपटातील मुख्य भूमिकांमध्ये तापसी पन्नू, भूमी पेडणेकर, कीर्ति कुल्हारी यांच्यासह आणखीन दोन अभिनेत्री असणार आहेत. चित्रपटाची कथा संरक्षण क्षेत्रातील 6 शूर महिला अधिकाऱयांवर बेतलेली आहे. चित्रपटात त्या गुप्त मोहीम राबवून शत्रूदेशाचे कट उधळून लावताना दाखविण्यात येणार आहेत.
सांगितिक चित्रफितीतही दर्शन चित्रपटांपूर्वी आरुषि एका सांगितिक चित्रफितीत दिसून येईल. याची माहिती तिने स्वतः समाजमाध्यमांवरून दिली आहे. टी-सीरिजसाठी तिने रोहित सुचंतीसोबत एका सांगितिक चित्रफितीचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. युद्धपटांमध्ये आतापर्यंत पुरुष अधिकाऱयांच्या शौर्यावरच भर देण्यात आला आहे. महिलांच्या दृष्टीकोनातून केवळ ‘राजी’ हा एकच चित्रपट आहे. नव्या चित्रपटाचे शीर्षक आणि उर्वरित तपशील लवकरच सादर केला जाणार असल्याचे टी-सीरिजकडून सांगण्यात आले आहे.