स्कूलमध्ये गुऊकुल फौंडेशनच्या माध्यमातून शिक्षण
प्रतिनिधी/ बेळगाव
विद्या प्रसारक मंडळाच्या भातकांडेज केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचे शनिवारी थाटात उद्घाटन झाले. कुंतीनगर, खासबाग येथील शाळेच्या मैदानात हा कार्यक्रम झाला. व्यासपीठावर अध्यक्ष मिलिंद भातकांडे, सचिव मधुरा भातकांडे, बीईओ रवी बजंत्री, सुवर्णा खन्नूकर, प्राचार्या साझिया जमादार, माजी प्राचार्या दया शहापूरकर, महांतेश पाटील आदी उपस्थित होते. गुऊकुल फौंडेशनच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते झाले.
विद्या प्रसारक मंडळाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलचा उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रारंभी कै. गजानन भातकांडे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. मान्यवरांच्या हस्ते फीत सोडून शाळेचे उद्घाटन झाले. दीपप्रज्वलन होऊन कार्यक्रमाला सुऊवात झाली. आराध्या देशपांडे यांनी स्वागतगीत सादर केले. दया शहापूरकर यांनी ओळख करून दिली. साझिया जमादार यांनी परिचय केला.
यावेळी मिलिंद भातकांडे म्हणाले, केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलमध्ये गुऊकुल फौंडेशनच्या माध्यमातून शिक्षण दिले जाणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांना शारीरिक, बौद्धिक, मानसिकदृष्ट्या परिपूर्ण केले जाणार आहे. एकूणच विद्यार्थ्यांची पूर्ण तयारी या शाळेमध्ये करून घेतली जाणार आहे, असे सांगितले.
चित्रफितीद्वारे केंब्रिज इंटरनॅशनल स्कूलची माहिती देण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. याप्रसंगी पालक, विद्यार्थी, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन कविता पोळ यांनी केले. आभार वृंदा कुलकर्णी यांनी मानले.