-केआयटीच्या पदाधिकाऱयांच्या हस्ते उपकरणाचे उद्घाटन
प्रतिनिधी/कोल्हापूर
ए.आय.सी.टी.ई. (नवी दिल्ली) या देशातील अव्वल अभियांत्रिकी महाविद्यालयांना प्रयोगशाळा आधुनिकीकरणासाठी प्रोत्साहनपर निधी वितरित करते. त्या अंतर्गत के.आय.टी. अभियांत्रिकी स्थापत्य विभागातील मॉडर्न सर्वेयिंग लॅब च्या आधुनिकीकरणासाठी मिळालेल्या 17 लाख 67 हजार रूपयांच्या निधितून उभारण्यात आलेल्या डिजिटल सर्वेयिंग व उपग्रहाद्वारे केल्या जाणाऱ्या भूमापन उपकरणाचे उद्घाटन करण्यात आले.
केआयटीमधील डॉ. विदुला स्वामी, प्रा. शीतल वरुर यांनी पाठवलेल्या प्रस्तावानुसार 17 लाख 67 हजारांचा निधी मंजूरी मिळाली आहे. महाविद्यालयातर्फे या निधीत भर घालून अत्याधुनिक पद्धतीने जमिनीची मोजणी करण्यासाठी लागणारी D.G.P.S.-Leica ceskeÀ GS16 व GS07 मॉडेल, सर्वे ग्रेड ड्रोन Ideaforge-Ninja मॉडेल, व सोबत हि उपकरणे हाताळण्यासाठी लागणारा उच्च प्रतीचा संगणक आणि सॉफ्टवेअर हे उपलब्ध केले आहे. त्यामुळे महाविद्यालयातील विध्यार्थ्यांना हि उपकरणे हाताळता येणार आहेत. यातून त्यांचे डिजिटल सर्वेयिंग व उपग्रहाद्वारे केल्या जाणाऱया भूमापन या विषयाचे कौशल्य वाढण्यास मदत होणार आहे. शिवाय जिल्हÎातील बांधकाम व भूमापन क्षेत्राला अचूक व सूक्ष्म पद्धतीने भूमापनासाठी याचा फायदा होणार आहे. यावेळी के. आय. टी. चे अध्यक्ष सुनील कुलकर्णी , उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, विश्वस्त भरत पाटील, कर्नल रावराणे, दिलीप जोशी, प्रभारी संचालक डॉ. एम. एम. मुजुमदार, विभागप्रमुख मोहन चव्हाण, प्रा. शीतल वरुर व स्थापत्य विभागाचे प्राध्यापक, प्रयोगशाळा सहाय्यक सचिन पठाडे उपस्थित होते.