सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धा : श्रेयस एफसी ए संघाला उपजेतेपद
क्रीडा प्रतिनिधी / बेळगाव
रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम आयोजित स्पॅडा चषक सिक्स ए साईड फुटबॉल स्पर्धेत अंतिम सामन्यात केआयपीटी संघाने श्रेयस एफसी ए संघाचा पराभव करून स्पर्धा वेणुग्राम चषक पटकाविला.
बालिका आदर्श येथील बुफा टर्फ मैदानावर आयोजित या स्पर्धेत एकूण 48 संघांनी भाग घेतला होता. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात केआयपीटी संघाने श्रेयस एफसीचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला. दुसऱया सत्रात उमर शेखने गोल करून 1-0 ची आघाडी मिळवून दिली. त्यानंतर श्रेयस एफसीच्या खेळाडूंनी गोल करण्यासाठी अनेक प्रयत्न केले पण त्यांना अपयश आले. शेवटी हा सामना केआयपीटी संघाने 1-0 असा जिंकून स्पॅडा वेणुग्राम चषक पटकाविला.
प्रमुख पाहुणे रोटे. अमित पाटील, विशाल पाटील, सौरभ बिर्जे आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या केआयपीटी संघाला 18 हजार रूपये रोख व आकर्षक चषक तर उपविजेत्या श्रेयस एफसी संघाला 12 हजार रूपये रोख व आकर्षक चषक देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडू म्हणून आदी याला तर उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून श्रेयस बांदेकर यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी विनोद होसुरकर, मंथन गावकर यानी पंच म्हणून काम पाहिले. इव्हेंट चेअरमन म्हणून योगेश पाटील व प्रणव पद्मण्णावर यांनी विशेष परिश्रम घेतले.