बेंगळूर/प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक ब्युरोच्या (एसीबी) अधिकाऱ्यांनी मंगळवारी कर्नाटक प्रशासकीय सेवा (केएएस) अधिकारी बी. सुधा यांच्या विविध मालमत्तांवर छापेमारी केली.
एसीबीच्या माहितीनुसार माहिती तंत्रज्ञान व जैव तंत्रज्ञान विभागाच्या प्रमुख असलेल्या सुधा यांच्या मालमत्तांवर अलीकडेच छापे टाकण्यात आले आहेत. शहरातील सहा ठिकाणी शोध घेण्यात आले. शुक्रवारी तिच्या साथीदारांच्या घरी छापा टाकण्यात आला. या महिन्याच्या सुरुवातीला एसीबीने मोठ्या प्रमाणात सोने, दहा लाख रुपये रोख आणि एक एसयूव्ही कार जप्त केली होती.