आजपासून केएटीचे कामकाज बंद करण्याचा निर्णय
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगावमध्ये केएटी (कर्नाटक प्रशासकीय लवाद) न्यायालय सुरू करण्यात आले. मात्र केवळ एकच न्यायाधीश येथे काम करत आहेत. दुसरे व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून बेंगळूर येथून काम करत आहेत. लवकरात लवकर काम होत नाही. त्यामुळे वकिलांनी येथील केएटी न्यायालयाचे कामकाज सुधारावे यासाठी जिल्हाधिकाऱयांसह केएटी चेअरमन यांना निवेदन देऊन मंगळवारपासून या न्यायालयाचे काम बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
वकिलांनी मोर्चा काढून जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले. केएटी न्यायालयासमोर आंदोलन केले. केएटीसाठी वकिलांनी तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानंतर बेळगावात केएटी न्यायालय सुरू केले. मात्र, त्याचे कामकाज अद्याप म्हणावे तसे सुरू नाही. त्यामुळे पक्षकारांना व वकिलांना त्याचा त्रास होत आहे. बऱयाच वेळा सूचना करूनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे आता कामकाज बंद करण्याचा निर्णय वकिलांनी घेतला आहे.
या न्यायालयात जोपर्यंत दोन बेंच बसत नाहीत तोपर्यंत आम्ही काम करणार नाही, असा इशारादेखील देण्यात आला आहे. यावेळी बेळगाव बार असोसिएशनचे उपाध्यक्ष गजानन पाटील, ऍड. सी. टी. मजगी, जनरल सेपेटरी आर. सी. पाटील, जॉईंट सेपेटरी शिवपुत्र फटकळ, सदस्य कमलेश मायाण्णाचे, ऍड. एन. आर. लातूर, प्रभाकर पवार यांच्यासह वकील उपस्थित होते.