प्रतिनिधी /बेळगाव
केएलई इंन्डिपेंडंट पीयू कॉलेजच्या वतीने पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जेएनएमसी कॉन्व्हेन्शन हॉल येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला केएलई सोसायटीच्या व्यवस्थापकिय मंडळाचे सदस्य व विधानपरिषद सदस्य महांतेश कवटगीमठ उपस्थित होते. यांच्या सोबत कृषी विद्यापिठाचे प्राचार्य डॉ. बी. डी. बिरादार व जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश चंद्रशेखर जोशी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्राविषयी माहिती देत केएलई संस्थेचा इतिहास कथन केला. विद्यार्थी व पालकांनी आपला अनुभव सांगितला. प्रेरणा नाईक यांनी आभार मानले तर गीता लक्कण्णावर व अन्नी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.