प्रतिनिधी / बेळगाव
केएलई कॉलेज ऑफ फार्मसी विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी आधुनिक शास्त्राrय प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. याअंतर्गत विद्यार्थ्यांना एक आठवडा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन म्हैसूरच्या अकॅडमी ऑफ जेएसएस, अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍण्ड रिसर्चचे प्रकुलगुरु व फार्मसी कौन्सिल ऑफ इंडियाचे डॉ. बी. सुरेश यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना त्यांनी फार्मसी विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच फार्मसी महाविद्यालये व उद्योग समूहाने एकत्र काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. केएलई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. विवेक सावजी उपस्थित होते. प्राचार्य डॉ. सुनील जलालपुरे, प्रा. एम. एस. गणाचारी यांचा परिचय करून दिला. गीतांजली सालीमठ यांनी स्वागत केले. ऐश्वर्या हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला उपप्राचार्य डॉ. एम. बी. पाटील यांच्यासह 300 हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. अनुश्री देशपांडे यांनी आभार मानले.