क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
केएलई फिजिओथेरपी महाविद्यालयाच्या कैरोष 2021 वार्षिक क्रिडा स्पर्धा मोठय़ा उत्साहात पार पडल्या.
जिल्हा क्रिडांगणावर आयोजित या स्पर्धेच्या उद्घाटक म्हणून जेष्ठ शरिरसौजेष्ठ व पटु गौंरांग गेंजी यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी इनडोअर व आऊटडोअर स्पर्धा घेण्यात आल्या. सदर स्पर्धा केएलई स्पोर्ट्स कमीटी फिजिओ थेरपी यांनी आयोजित केल्या होत्या. सर्व युजी व पीजी स्टुडंट स्पर्धेत भाग घेतला होता.