प्रतिनिधी /बेळगाव
राष्ट्रीय मूल्यांकन समिती (नॅक) च्या सदस्यांनी केएलई अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन ऍन्ड रिसर्च या समांतर विद्यापीठाला भेट देऊन मूल्यमापन केले. या समितीमध्ये पुदुच्चेरी येथील बालाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाषचंद्र पारिजा, दिल्लीच्या इन्स्टिटय़ूट ऑफ फार्मास्युटिकल्स सायन्स ऍन्ड रिसर्चचे संचालक डॉ. प्रभातकुमार साहू, गुजरातच्या आर. के. विद्यापीठाचे संचालक प्रा. डॉ. प्रियांशु राठोड तसेच डॉ. ईश शर्मा, डॉ. श्रद्धा रमेश, डॉ. विजया मिश्रा या पंजाब, पुणे, वाराणसी येथील तज्ञांचा समावेश आहे.
सदस्यांनी कुलगुरु, विभागप्रमुख, संस्थाप्रमुख यांच्याशी चर्चा केली. शिक्षण पद्धत, अध्ययन पद्धत, संशोधन, विद्यापीठाची प्रगती यांचेही मूल्यमापन केले. याशिवाय प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन सदस्य, माजी विद्यार्थी आणि पालक यांच्याशीसुद्धा चर्चा केली.
याप्रसंगी कुलपती डॉ. प्रभाकर कोरे, कुलगुरु डॉ. विवेक सावजी, कुलसचिव डॉ. व्ही. ए. कोठीवाले, समन्वयक डॉ. सीमा हळ्ळीकेरीमठ आदी उपस्थित होते.