प्रतिनिधी / बेळगाव
येथील केएलई सोसायटीने कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी मुख्यमंत्री रिलीफ फंडाला 2 कोटीचा निधी दिला आहे. केएलईचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनी बेंगळूर येथे 6 मे रोजी मुगयमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्याकडे हा निधी सुपूर्द केला.
डॉ. प्रभाकर कोरे यांनी प्रभाकर कोरे पेडिट सौहार्द सोसायटीतर्फे 11 लाख, चिदानंद बसवप्रभू केरे को-ऑप. सहकारी साखर कारखान्यातर्फे 5 लाख, शिवशक्ती शुगर्स सौंदत्तीतर्फे 5 लाख, राणी चन्नम्मा महिला सहकारी बँकेतर्फे 5 लाख, याशिवाय डॉ. चन्नसिद्धराम, शिवाचार्य स्वामीजी, श्री काडसिद्धेश्वर संस्थानमठ, श्री क्षेत्र येडूर यांच्यातर्फे 5 लाख यासह एकूण 2 कोटीचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
या प्रसंगी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, पालकमंत्री जगदीश शेट्टर, जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी, विधानसभेचे नेते महांतेश कवटगीमठ आदी उपस्थित होते.
कोविडविरुद्धच्या लढाईत सरकारला मदतीची गरज आहे. सरकारने समाजाला मदतीचे आवाहन केले आहे. त्यानुसार डॉ. प्रभाकर कोरे यांनी हा निधी सुपूर्द केला आहे.