प्रतिनिधी / बेळगाव
केएलई स्कूल ऑफ म्युझिक मध्ये दिनांक 10 फेब्रुवारी 2021रोजी वार्षिकोत्सव आणि दिवंगत पंडित हयवदन जोशी यांच्या 11 व्या पुण्यतिथीनिमित्त “समूह भजन स्पर्धा” यशस्वीरित्या पार पडल्या. या भजन स्पर्धेसाठी बेळगाव ,काकती ,खानापूर ,नंदगड या भागातून एकूण 22 भजनी मंडळानीं भाग घेतला होता .या स्पर्धा सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत चालू होत्या. या स्पर्धेसाठी गदग येथील पंडित पंचाक्षरी गवाईगळ या संगीत महाविद्यालयाच्या प्राध्यापिका डॉ. सुमित्रा काडदेवरमठ आणि कोल्हापूरच्या डॉ.रंजन कुलकर्णी यांनी परीक्षक म्हणून काम केले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून के एल ई च्या जे.एन.एम.सी चे व्हाइस प्रिंसिपल आणि स्कूल ऑफ म्युझिकचे कॉर्डिनेटर डॉ. राजेश पवार उपस्थित होते.
संध्याकाळच्या सांगता समारंभाच्या वेळी व्यासपिठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी 3 पारितोषिक घोषित केली. पहिले पारितोषिक रु.5000/- क्रांती महिला मंडळ खासबाग बेळगाव, दुसरे पारितोषिक रु. 3000/- साधना भजनी मंडळ बेळगाव आणि तृतीय पारितोषिक रु.2000/- रवळनाथ भजनी मंडळ बेळगाव या संघाने पटकाविले. स्कूल ऑफ म्युझिकचे कॉर्डिनेटर डॉ.राजेंद्र भांडारकर यांनी सभेला उद्देशून म्हणाले की ” 2008 मध्ये पं.हयवदन जोशी यांनी स्कूल ऑफ म्युझिकचा पाया घातला आणि त्यांनी जी शिस्त संगीत विभागाला घालून दिली होती ,ती शिस्त आज १३ वर्षे आम्ही आजतागायत पाळत आलो आहोत .संगीत विभागातील सर्व शिक्षक वर्गाचे त्यानी कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ राजेश पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या, ते म्हणाले” मी व्हाइस प्रिंसिपल झाल्यापासून बाहेर माझा खूप ठिकाणी सत्कार झाला पण स्कूल ऑफ म्यूझिकच्या माझ्या घरात माझा जो सत्कार केला गेला तो माझ्यासाठी खूपच मौल्यवान आहे.
या कार्यक्रमाची सुरुवात स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थिनींनी गणेश स्तवनाने केले . स्कूल ऑफ म्यूझिक घ्या प्राचार्या डॉ.स्नेहा राजुरीकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्कूल ऑफ म्युझिकच्या विद्यार्थिनी श्रीमती विद्या देशपांडे, श्रीमती सुहासिनी देशपांडे आणि कुमारी श्रेया हुद्दार यांनी केले .या कार्यक्रमासाठी स्कूल ऑफ म्यूझिकच्या प्राध्यापिका डॉ. सुनिता पाटील ,डॉ.दुर्गा नाडकर्णी, श्रीमती सीमा कुलकर्णी ,श्री जितेंद्र साबणावर ,श्री यादवेंद्र पुजारी ,श्री राजेंद्र भागवत, स्कूल ऑफ म्युझिक से सर्व विद्यार्थी आणि रसिक उपस्थित होते.